Thursday, September 29, 2016

                       आज मात्र मला शांत झोप लागेल !

आता खात्री पटतेय की काही तड लागेल
आणि आज मात्र मला शांत झोप लागेल

तसं म्हटलं तर माझं असं काहीच जळत नव्हतं
कोणी धन लुटत नव्हतं की कुठे घर पळत नव्हतं
पण येता जाता एकच विचार
कि "उरी" ची सल कशी भागेल? ।।१।।
पण आज मात्र मला शांत झोप लागेल .....

"उठता लाथ बसता बुक्की" हे किती काळ बघायचं?
मुकाट्यानं मार खात का म्हणून जगायचं?
खालच्या मानेनं जगताना
अन्न कसं गोड लागेल? ।।२।।
पण आज मात्र मला शांत झोप लागेल....

आता म्हणावं साल्यांनो, तुमची सद्दी संपली
अर्ज-विनंत्यांची आमची जुनी रद्दी संपली
आता निमपट घ्यायला जाल तर
चौपट द्यावं लागेल ।।३।।

आज मात्र मला शांत झोप लागेल.....
आज मात्र मला शांत झोप लागेल






7 comments: