Tuesday, October 20, 2009

आयुष्य काय माझे ??

आयुष्य काय माझे, गमते मला कधी की
आहे प्रशांत दरिया,  ज्याला किनार नाही
क्षण लोटता परन्तु, दाटे मनात किन्तु
हे वाळवंट सारे, जिकडे निवार नाही
                       आयुष्य काय माझे ??

चैतन्यव्याप्त सारे, भासे कधी वसन्ति
आनंद-वैभवाला,  आता सुमार नाही
क्षण लोटता परन्तु, दाटे मनात किन्तु
काट्यांशिवाय दुसरा, इकडे धुमार नाही
                          आयुष्य काय माझे ??

हे चांदणे रुपेरी, देते मना उभारी
आता मनात दुसरा, काळा विचार नाही
क्षण लोटता परन्तु, दाटे मनात किन्तु
की घाव हा जिव्हारी, ज्याला उतार नाही
                              आयुष्य काय माझे ??

1 comment:

  1. क्षण लोटता परन्तु, दाटे मनात किन्तु
    Sundar!

    ReplyDelete