Monday, January 19, 2015

।। काकडा ।।


                

उठा गुरुवरा, करुणागारा उषःकाल झाला
पुण्यपदांचे  दर्शन घ्याया भक्तचमू जमला    ।। १ ।।

निद्रा त्यजुनी आसन सोडा, मुख ही प्रक्षाला
सुवासिनींनी तयार केला दुग्धाचा पेला      ।। २  ।।

उष्णोदक अन सुगंध द्रव्ये स्नानाचा थाट
गुरुकीर्तीगुणगान कराया किती तिष्ठले भाट   ।। ३ ।।

गंधपुष्प सौभाग्यद्रव्यमय स्वीकारावी पूजा
स्वहित साधण्या गुरुसेवेहून मार्ग नाही दुजा    ।। ४ ।।