Saturday, December 29, 2012



Hi guys, I have composed this poem in tribute to the Delhi Girl:

~~~~ तेजस्विनी शलाका ~~~~



हि वेळ संगराची, आला प्रसंग बाका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

हे रोजचेच घडते सारे तुम्हा समक्ष
सीता अनेक पडती लंकापतींस  भक्ष
ह्या वासनासूरांची लंका तुम्हीच फुंका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

धर्मास नाही वाली ना कायदा समर्थ
सत्ताधीशांपुढे ह्या सारेच कर्म व्यर्थ
आता तुम्हीच द्यावा आधार एकामेकां 
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

निस्तेज कायद्याचे घडतील आप-सव्य
माझ्या पित्यास नेते देतील दान-द्रव्य
पण मोल इभ्रतीचे द्रव्यामधे तुळे का??
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

"झडतील नित्य जेथे सन्मान दुहितांचे
घडतील नित्य तेथे सहवास देवतांचे" **
विसरू नका कधी ह्या प्राचीन पुण्यश्लोका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

[** यत्र नार्याः पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवतः ]