Here I have made a humble attempt to translate Ghalib's shers into Marathi. Gustakhi muaf !!
Woh aake KHwaab meiN taskeen-e-iztiraab to de
Wali! Mujhe tapish-e-dil, mazaal-e-KHwaab to de
[ taskeen = satisfaction, iztiraab = anxiety, tapish = burn/passion,mazaal = strength ]
येउनी स्वप्नात माझ्या तु मला आराम दे
अंतरीच्या तळमळीला थोडका विश्राम दे
किंबहुना व्हावयाला या सुखाला पात्र मी
त्याआधीही, हे प्रभो!, स्वप्नाळलेली रात्र दे !!
Dikhaake jumbish-e-lab hee tamaam kar hamko
Na de jo bosa, to muNh se kaheeN jawaab to दे
[ jumbish = motion/vibration, bosa = kiss ]
ना मिळो जर ना मिळाली भाववेडी चुंबने
धन्य मी मानेन तरीही या जगीचे जन्मणे
हालवूनी ओष्ठरूपी पाकळयांच्या महिरपी
तेवढी प्रश्नांस माझ्या उत्तरे तू मात्र दे !!
.....त्याआधीही, हे प्रभो!, स्वप्नाळलेली रात्र दे !!
Sunday, October 24, 2010
Friday, January 1, 2010
...आठवणींच्या बागा
मज तुझी आठवण येता
सुखदायी माझ्या गावा
मन फिरुन एकदा घेते
स्मृतिचित्रांचा मागोवा
ती लाल घरे, ते माड
वळणावळणांच्या वाटा
रोजच्या रोज त्यामधुनी
आनंद येतसे भेटा!
त्या उषःकाल भूपाळया
ती संतकवींची कवने
संस्कारशिल्प घडवाया
ती पंतोजींची वचने
ते काजू-बाग, आमराया
त्यांमधली संथ दुपार
त्या दिवेलागणी वेळा
अन मनातली हुरहुर...
त्या तलम किनारयावरती
लाटांच्या अविरत ओळी
काढिती शंख-शिंपले
पुळणावरती रांगोळी
त्या निळसर डोंगररांगा
तो निळl-जांभळl पत्थर
अन पाउस पहिला पडता
ते मृद्गंधाचे अत्तर !!
ह्या शहरांमध्ये उरली
केवळ स्वप्नांपुरती जागा
स्वप्नातच फुलवायाच्या
त्या आठवणींच्या बागा,
त्या आठवणींच्या बागा...
सुखदायी माझ्या गावा
मन फिरुन एकदा घेते
स्मृतिचित्रांचा मागोवा
ती लाल घरे, ते माड
वळणावळणांच्या वाटा
रोजच्या रोज त्यामधुनी
आनंद येतसे भेटा!
त्या उषःकाल भूपाळया
ती संतकवींची कवने
संस्कारशिल्प घडवाया
ती पंतोजींची वचने
ते काजू-बाग, आमराया
त्यांमधली संथ दुपार
त्या दिवेलागणी वेळा
अन मनातली हुरहुर...
त्या तलम किनारयावरती
लाटांच्या अविरत ओळी
काढिती शंख-शिंपले
पुळणावरती रांगोळी
त्या निळसर डोंगररांगा
तो निळl-जांभळl पत्थर
अन पाउस पहिला पडता
ते मृद्गंधाचे अत्तर !!
ह्या शहरांमध्ये उरली
केवळ स्वप्नांपुरती जागा
स्वप्नातच फुलवायाच्या
त्या आठवणींच्या बागा,
त्या आठवणींच्या बागा...
Subscribe to:
Posts (Atom)