Saturday, December 29, 2012



Hi guys, I have composed this poem in tribute to the Delhi Girl:

~~~~ तेजस्विनी शलाका ~~~~



हि वेळ संगराची, आला प्रसंग बाका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

हे रोजचेच घडते सारे तुम्हा समक्ष
सीता अनेक पडती लंकापतींस  भक्ष
ह्या वासनासूरांची लंका तुम्हीच फुंका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

धर्मास नाही वाली ना कायदा समर्थ
सत्ताधीशांपुढे ह्या सारेच कर्म व्यर्थ
आता तुम्हीच द्यावा आधार एकामेकां 
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

निस्तेज कायद्याचे घडतील आप-सव्य
माझ्या पित्यास नेते देतील दान-द्रव्य
पण मोल इभ्रतीचे द्रव्यामधे तुळे का??
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

"झडतील नित्य जेथे सन्मान दुहितांचे
घडतील नित्य तेथे सहवास देवतांचे" **
विसरू नका कधी ह्या प्राचीन पुण्यश्लोका
सांगून हेच गेली, तेजस्विनी शलाका

[** यत्र नार्याः पूज्यन्ते, रमन्ते तत्र देवतः ]


Tuesday, August 28, 2012

आरती फेसबुक ची !!

I have written an आरती (in Marathi) on nothing else but Facebook ! :)) The idea is to acknowledge its prowess and ubiquitous nature in a poetic way :))

See if you like this...

आरती फेसबुका (चाल - "आरती ज्ञानराजा")

आरती फेसबुका । आणी सकळां समीपां 
टिकविशी नातेबंध । जोडूनिया एकमेकां 
आरती फेसबुका.... ।। १ ।।

कितिएक सखे चांगले । पोटासाठी पांगले 
तुझिया गुणसुखे । पुन्हा सारे एकवटले 
आरती फेसबुका.... ।। २ ।।

अफाट या जगती । क्रिया अचाट घडती 
तुझिया सहवासे । क्षणामाजी समजती 
आरती फेसबुका.... ।। ३ ।।

रोजचेच कर्तव्य । किंवा काही शुभकार्य 
तुला आठविणे आता । झाले आहे अनिवार्य 
आरती फेसबुका.... ।। ४ ।।

सामर्थ्य तुझे श्रेष्ठ । सर्वांहुनी बलिष्ठ 
बुडविशी महासत्ता । क्रूर आणि गर्विष्ठ 
आरती फेसबुका.... ।। ५ ।।

आता इतुकी प्रार्थना । सर्वव्यापी पावना 
तुझ्या कृपे करुनी । वाढो शांती-सद्भावना 
आरती फेसबुका.... ।। ६ ।।


Sunday, January 1, 2012

Translation of One Geet Ramayan Song


Attempted  this translation to give an idea of Geet Ramayana to a friend of mine, who doesnt understand Marathi (of course, I know the limitations of what I have written, compared to the original song!). I apologize ग दि माडगुळकर for touching his divine poetry ! Credit of all the good part of this translation goes to ग दि मा. Any fault/drawback is obviously mine ! (I have retained the original poetry whenever possible, as the idea was to come up with a quick translation to give a non-Marathi person a glimpse of Geet Ramayana)

A quick background:
This particular song is about that incident of Ramayan when Ravana comes in an 'avatar' of a Sadhu and deceptively takes Seeta away. When Rama and Lakshmana come back to the Aashram from the forests, they find all the belongings of the Aashrama haywire and find Seeta gone missing ! They search for her all over but fail in tracing her out. Rama gets desparate & devastated.  He also gets frustrated with repeated calamities falling upon him one after the other. And says following in dispair:


उजड़ा आश्रम पीछे छूटा,
कहा खो गयी मेरी सीता !

कदम्ब-तरु तुम देखो सत्वर
यदि दिखे वो नदी के तट पर
हाथ कमण्डलु, कलश कटी पर
हरिमध्या हैं वो गज-गतीता

उजड़ा आश्रम पीछे छूटा,
कहा खो गयी मेरी सीता !


देखो लक्ष्मण - आँखे किसकी?
मुझे दे रही झाँकी उसकी
मृग-शावक ये उसका प्यारा
उसको भी मैं पाऊ रोता

उजड़ा आश्रम पीछे छूटा,
कहा खो गयी मेरी सीता !



अब क्यां रह गया बाकी सहना
चन्द लम्हों का मेरा जीना
दुःख ही दुःख हैं जीवन-सरिता
लो - मैं भी उसमे बह जाता

उजड़ा आश्रम पीछे छूटा,
कहा खो गयी मेरी सीता !


***********************************
Original Marathi version by ग दि मा:-

उजाड आश्रम उरे काननी,
कोठे सीता जनक-नंदिनी?


सांग कदम्बा बघुनी सत्वर
दिसते का ती नदी-तटावर
करी कमण्डलु, कलश कटीवर
हरि-मध्या ती मन्दगामिनी

कोठे सीता जनक-नंदिनी?



पहा लक्ष्मणा, दिसती डोळे
प्रियेचेच ते विशाल भोळे
मृगशावक हे तिचे कोवळे
का याच्या ही नीर लोचनी?

कोठे सीता जनक-नंदिनी?


काय भोगणे आता उरले?
चार दिसांचे चरित्र सरले
अन दुःखांचे सागर भरले
राम जाऊदे त्यात वाहुनी

कोठे सीता जनक-नंदिनी?

Sunday, October 24, 2010

Ghalib in Marathi - Translation of Ghalib's shers

Here I have made a humble attempt to translate Ghalib's shers into Marathi. Gustakhi muaf !!


Woh aake KHwaab meiN taskeen-e-iztiraab to de
Wali! Mujhe tapish-e-dil, mazaal-e-KHwaab to de

[ taskeen = satisfaction, iztiraab = anxiety, tapish = burn/passion,mazaal = strength ]


येउनी स्वप्नात माझ्या तु मला आराम दे
अंतरीच्या तळमळीला थोडका विश्राम दे
किंबहुना व्हावयाला या सुखाला पात्र मी
त्याआधीही, हे प्रभो!, स्वप्नाळलेली रात्र दे !! 


Dikhaake jumbish-e-lab hee tamaam kar hamko
Na de jo bosa, to muNh se kaheeN jawaab to दे

[ jumbish = motion/vibration, bosa = kiss ]


ना मिळो जर ना मिळाली भाववेडी चुंबने
धन्य मी मानेन तरीही या जगीचे जन्मणे
हालवूनी ओष्ठरूपी पाकळयांच्या महिरपी
तेवढी प्रश्नांस माझ्या उत्तरे तू मात्र दे !!
           .....त्याआधीही, हे प्रभो!, स्वप्नाळलेली रात्र दे !! 

Friday, January 1, 2010

...आठवणींच्या बागा

मज तुझी आठवण येता
सुखदायी माझ्या गावा
मन फिरुन एकदा घेते
स्मृतिचित्रांचा मागोवा

ती लाल घरे, ते माड
वळणावळणांच्या वाटा
रोजच्या रोज त्यामधुनी
आनंद येतसे भेटा!

त्या उषःकाल भूपाळया
ती संतकवींची कवने
संस्कारशिल्प घडवाया
ती पंतोजींची वचने

ते काजू-बाग, आमराया
त्यांमधली संथ दुपार
त्या दिवेलागणी वेळा
अन मनातली हुरहुर...

त्या तलम किनारयावरती
लाटांच्या अविरत ओळी
काढिती शंख-शिंपले
पुळणावरती रांगोळी

त्या निळसर डोंगररांगा
तो निळl-जांभळl पत्थर
अन पाउस पहिला पडता
ते मृद्गंधाचे अत्तर !!

ह्या शहरांमध्ये उरली
केवळ स्वप्नांपुरती जागा
स्वप्नातच फुलवायाच्या
त्या आठवणींच्या बागा,
त्या आठवणींच्या बागा...

Thursday, November 19, 2009

स्वैर अनुवाद (free-form translation)

I have confidence in Sunshine  
I have confidence in Rain         
I have confidence...                  
the Spring will come again        
And besides that, you see       
I have confidence in me !!         
    (- from Sound of Music)


कडा रुपेरी काळोखाची, तीही पुन्हा उजळेल
रवितेजाचा मला भरवसा, क्षितिजावर झळकेल
वसंत येईल पुन्हा एकदा, कोकिळ घालिल साद
संकटातही अभेद्य राहे,
माझा आशावाद, माझा आशावाद !!

Sunday, October 25, 2009

सुडोकू (मुक्तछन्द कविता)

(Please note that this poem is not a manifestation of any of my real-life experiences but is born only out of imagination !! :) )

दरवर्षी
ज्येष्ठ-आषाढ़ आला की
माझ्या मनात सुरु होते
एक विलक्षण कालवाकालव
कारण
पावसाळ्यापासूनच सुरु झाला होता
आपल्या भेटींचा सिलसिला;
मग
एक पावसाळा आला अस्सा कोरडाठिक्कर
आणि मागे उरला...
फक्त माझ्या मनातील ओलावा
आणि
आपण ज्यावर फ़ुलीगोळा खेळलो
ते बसचं तिकिट
आणि
दोघांनी मिळून सोडवलेलं
एक अर्धवट सुडोकू...!!