उठा गुरुवरा, करुणागारा उषःकाल झाला
पुण्यपदांचे दर्शन घ्याया भक्तचमू जमला ।। १ ।।
निद्रा त्यजुनी आसन सोडा, मुख ही प्रक्षाला
सुवासिनींनी तयार केला दुग्धाचा पेला ।। २ ।।
उष्णोदक अन सुगंध द्रव्ये स्नानाचा थाट
गुरुकीर्तीगुणगान कराया किती तिष्ठले भाट ।। ३ ।।
गंधपुष्प सौभाग्यद्रव्यमय स्वीकारावी पूजा
स्वहित साधण्या गुरुसेवेहून मार्ग नाही दुजा ।। ४ ।।
खुप छान मंदार!
ReplyDelete